धम्मध्वज वंदना

धम्मध्वज वंदना


पाली:

वजिर संघात कायस्स अङगीरस्स तादिनो ।  
केश मस्सु ही अक्खिनं निलठ्ठाने हि रस्सियो ।।  
निलवण्णा निच्छरन्ति अनंत काल भूदके ।। १ ।।  
वजिर संघात कायस्स अङगीरस्स तादिनो ।  
छबी तो चेब्ब अक्खिनं पितठ्ठाने हि रस्सियो ।।  
पितवण्णा निच्छरन्ति अनंत काल भूदके ।। २ ।।  
वजिर संघात कायस्स अङगीरस्स तादिनो ।  
मस्स लोहित अक्खिनं रत्तठ्ठाने हि रस्सियो ।।  
रत्त वण्णा निच्छरन्ति अनंत काल भूदके ।। ३ ।।  
वजिर संघात कायस्स अङगीरस्स तादिनो ।  
अट्ठदन्ते हि अक्खिनं सेतठ्ठाने हि रस्सियो ।।  
सेतवण्णा निच्छरन्ति अनंत काल भूदके ।। ४ ।।  
वजिर संघात कायस्स अङगीरस्स तादिनो ।  
तेसं तेसं सरीरत्नं नानाठ्ठाने हि रस्सियो ।।  
प्रभस्सरा निच्छरन्ति अनंत काल भूदके ।। ५ ।।  
वजिर संघात कायस्स अङगीरस्स तादिनो ।  
एवं सब्बनं रस्सिहि निच्छरन्ति दिसे दिसं ।।  
अनंत अथो उध्द च अम तवं मनोहरं ।  
काया वाचा चित्तेन अङिगरस्स नामामहं ।। ६ ।।

मराठी:

वज्रासारखा अभेद्य देह धारण करणाऱ्या भगवान बुध्दाच्या डोक्यावरील व दाढी मधल्या केसातून 
आणि डोळ्यांच्या नील स्थानातून प्रभावित होणारा 'नीळा' रंग समुद्र, 
धरणी व आकाशात व्यापून राहीला आहे. ।। १ ।।  
वज्रासारखा अभेद्य देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धांच्या पिवळसर त्वचेतून 
व डोळ्यातील पिवळ्या स्थानातून प्रभावित होणारा 'पिवळा' रंग समुद्र, 
धरणी व आकाशात व्यापून राहिला आहे. ।। २ ।। 
वज्रासारखा अभेद्य देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धांच्या मांसातील 
व डोळ्यातील रक्तवर्ण स्थानातील आणि रक्तातून प्रभावित होणारा 'लाल' रंग समुद्र, 
धरणी व आकाशात व्यापून राहिला आहे. ।। ३ ।।  
वज्रासारखा अभेद्य देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धांच्या दातातून, 
अस्थितून व डोळ्यातील पांढऱ्या बुब्बुळांतून प्रभावित होणारा 'शुभ्र' रंग समुद्र, 
धरणी व आकाशात व्यापून राहिला आहे. ।। ४ ।।  
वज्रासारखा अभेद्य देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धांच्या निरनिराळ्या अवयवांतून प्रभावित होणारा       
'तपकिरी' किंवा 'केसरी' रंग समुद्र, धरणी व आकाशात व्यापून राहिला आहे. ।। ५ ।।  
वज्रासारखा अभेद्य देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धांच्या सर्वांगाने प्रभावित होणारे 
वरील पाच रंग प्रखरतेने सागर, धरती व गगनात व्याप्त आहेत. 
अमृताप्रमाणे  संतोष देणाऱ्या भगवान बुध्दांच्या पंचरंगी धम्मध्वजाला मी कायेने, 
वाचेने आणि मनाने वंदन करतो / करते. ।। ६ ।।

Post a Comment

0 Comments