बुद्ध पुजा

बुद्ध पुजा


पाली:

वण्ण - गन्ध - गुणोपेतं एतं कुसुमसन्तति ।  
पूजयामी मुनिन्दस्स, सिरीपादसरोरूहे ।। १ ।।  
पूजेमि बुद्धं कुसूमेन नेनं पुञ्ञेन मेतेन लभामि मोक्खं ।  
पुफ्फं मिलायति यथा इदं मे, कायो तथा याति विनासभावं ।। २ ।।  
घनसारप्पदित्तेन, दिपेन तमधंसिना ।  
तिलोकदिपं सम्बुध्दं, पूजयामि तमोनुदं ।। ३ ।।  
सुगंधिकाय - वदनं - अनन्त - गुणगंधिना ।  
सुगंधिना हं गन्धेन, पूजयामि तथागतं ।। ४ ।।  
बुध्दं धम्मं च संघं सुगततनुभवा धातवो धातुगब्भे ।  
लंकायं जम्बुदीपे तिदस पुरवरे नागलोके च थूपे ।। ५ ।।  
सब्बे बुध्दस्स बिम्बे सकलदसदिसे केस लोमादि धातु वंदे ।   
सब्बेपि बुद्धं दसबलतनुजं बोधिचेत्यं नमामि ।। ६ ।।  
वन्दामि चेतियं सब्बं सब्बठानेसु पतिठ्ठितं ।  
सारीरिक - धातु महाबोधि बुध्द - रुपं सकलं सदा ।। ७ ।।  

मराठी:

मी वर्ण, सुगंध आणि सुंदर गुणांनी युक्त अशा फुलांनी 
भगवान बुध्दांच्या चरण कमलांची पुजा करतो / करते. ।। १ ।।  
ह्या फुलांनी मी बुध्दांना पुजितो / पुजिते. ह्या पुण्याने मला निर्वाण प्राप्त होवो. 
हे फुल जसे कोमजते, तसे माझे शरीर विनाशाकडे जाईल. ।। २ ।। 
अज्ञानरुपी अंधःकाराचा नाश करणाऱ्या त्रिलोक्य दीप बुध्दांची, लख्ख 
प्रकाश देणाऱ्या दिव्याने पुजा करतो / करते.  ।। ३ ।।
अनेक प्रकारची सुगंधी द्रव्ये मिसळलेल्या गंधाने, ज्याचे शरीर सुगंधी आहे, 
अशा तथागतांची पुजा करतो / करते.।। ४ ।।  
बुध्द, धम्म व संघ ह्यांना तसेच लंका, जंबूव्दिप, नागलोक ह्यामधील स्तूपांतून 
बुध्दांच्या शरीरांतील जितके अवशेष स्थापित आहेत, त्या सर्वांना वंदन करतो / करते. ।। ५ ।।  
सर्व दाही दिशांमधून जितकी बुध्दांची प्रतीक आहेत, तसेच दहा बलाने परिपूर्ण 
अशा बुध्दांच्या शरीराचे केश वगैरे अवशेष स्थापिलेले चैत्य आहेत, 
त्या सर्वांना वंदन करतो / करते. ।। ६ ।।  
सर्व ठिकाणी स्थापिलेल्या चैत्यांना, बुध्द शरीराच्या अवशेषांना व महान प्रज्ञा 
प्राप्त केलेल्या बुध्दरुपांना वंदन करतो / करते. ती सर्व बुध्दांचीच प्रतिके आहेत. ।। ७ ।। 

Post a Comment

0 Comments