२२ प्रतिज्ञा



२२ प्रतिज्ञा

१. मी ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
२. मी राम, कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्याची उपासना करणार नाही.
३. मी गौरी, गणपती इत्यादी  हिन्दू धर्मातील कोणत्याच देव देवतेस मानणार नाही 
   किंवा त्याची उपासना करणार नाही.
४. देवाने अवतार घेतला आहे यावर माझा विश्वास नाही.
५. बुध्द हा विष्णूचा अवतार आहे, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय, असे मी मानतो / मानते.
६. मी श्राध्द पक्ष करणार नाही, मी पिंडदान करणार नाही.
७. मी बौध्द धम्माच्या विरुद्ध, विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
८. मी कोणतेही क्रियाकर्म ब्राम्हणाच्या हातून करवून घेणार नाही.
९. सर्व मनुष्य मात्र एक समान आहेत असे मी मानतो / मानते.
१०. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
११. मी भगवान बुध्दांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
१२. मी भगवान बुध्दांनी सांगितलेल्या दहा पारमिता पाळीन.
१३. मी सर्व प्राणी मात्रांवर दया करीन व त्यांचे लालन पालन करीन.
१४. मी चोरी करणार नाही.
१५. मी व्यभिचार करणार नाही.
१६. मी खोटे बोलणार नाही.
१७. मी दारू पिणार नाही.
१८. प्रज्ञा, शिल, करुणा या बौध्द धम्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी आमचे जीवन चालवीन.
१९. मी माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला बाधक असणाऱ्या व मनुष्यमात्रास 
    असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो / करते व बौध्द धम्माचा स्वीकार करतो / करते.
२०. बौध्द धम्म हा सद्धम्म आहे, अशी माझी खात्री पटलेली आहे.
२१. माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो / मानते.
२२. मी इतः पर बुध्दांच्या शिकवणीप्रमाणे वागेन, अशी प्रतिज्ञा करतो / करते.

Post a Comment

0 Comments