धम्मपालन गाथा

धम्मपालन गाथा


पाली:

सब्ब पापस्स अकरणं कुसलस्स उपसंपदा ।  
सचित्तपरियोदपनं एतं बुध्दान सासनं ।। १ ।।  
धम्मं चरे सुचरितं न तं दुच्चरितं चरे ।  
धम्मचारी सुखं सेति अस्मिं लोके परम्हिच ।। २ ।।  
न तावता धम्मधरो यावता बहु भासति ।  
यो च अप्पम्पि सुत्वान धम्म कायेनं पस्सति ।  
सवे धम्मधरो होती यो धम्मं नप्पमज्जति ।। ३ ।।

मराठी:

सर्व दुराचरणापासून अलीप्त राहणे, कुशल कर्म संपादन करणे, स्वचित्त आरशाप्रमाणे निर्मळ ठेवणे, 
हीच बुध्दांची शिकवण आहे . ।। १ ।।  
धम्माचे योग्य आचरण करावे, वाईट प्रकारे नाही. या धम्माचे आचरण करणारा, 
लोक-परलोकात सुखाने झोप घेतो. ।। २ ।।  
पुष्कळ बोलण्याने कुणीही धम्मधर होत नसतो. जे धम्माचे प्रत्यक्ष कायेने 
अनुकरण करतात व जे धम्माची अवहेलना करीत नाहीत, ते सर्व "धम्मधर" होतात. ।। ३ ।।

Post a Comment

0 Comments