पत्तीदान

पत्तीदान


पाली:

इदंनो ञातीनं होतु, सुखिता होन्तु ञातयो ।  
इदंनो ञातीनं होतु, सुखिता होन्तु ञातयो ।  
इदंनो ञातीनं होतु, सुखिता होन्तु ञातयो ।  
उन्नमे उदकं वट्टं यथा निन्नं पवत्तति ।  
एवमेव इत्तो दिन्नं पेतानं उपकप्पति ।। १ ।।  
यथा वारिवहा पूरा, परीपूरेन्ति सागरं ।  
एकमेव इत्तो दिन्नं पेतानं उपकप्पति ।। २ ।।  
इच्छितं पत्थितं तुय्हं खिप्पमेव समिज्झतु ।  
सब्बे पुरेन्तु चित्तसंकप्पा चन्दो पन्नरस्सो यथा।। ३ ।।  
आयुरारोग्य सम्पति, सब्बसम्पतिमेवच ।  
ततो निब्बाण सम्पत्ती,  इमीना ते समिज्झतु ।। ४ ।।  
अनिच्चा वत सङखारा उप्पादवय - धम्मिनो ।  
उप्पज्जित्वा निरुज्झन्ति तेसं वूपसमो सुखो ।। ५ ।।  
कालकतानं आम्हाकं ञातीन पुञ्ञत्था इमं ।  
भिक्खं भिक्खू संघस्स देमं ।। ६ ।।

मराठी:

आमच्या या दानाचे पुण्य आमच्या परिजनास प्राप्त होवो व ते सुखी होवोत. 
आमच्या या दानाचे पुण्य आमच्या परिजनास प्राप्त होवो व ते सुखी होवोत.
आमच्या या दानाचे पुण्य आमच्या परिजनास प्राप्त होवो व ते सुखी होवोत.
जसे उंच जागेवर पडलेले पावसाचे पाणी, सखल भूमीकडे वाहत जाते, 
तसेच हे कुशल कर्माचे फळ, आमच्या परिजनास प्राप्त होवो. ।। १ ।।
जसे भरलेल्या नदीचे पाणी समुद्रांस मिळते, तसेच हे कुशल कर्माचे फळ, 
आमच्या परिजनास प्राप्त होवो. ।। २ ।।  
तुमच्या इच्छित आणि अपेक्षित सर्व वस्तू तुम्हाला शीघ्र मिळोत, तुमच्या चित्ताचे सर्व संकल्प, 
पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण होवोत. ।। ३ ।।  
तुम्हाला दीर्घायुष्य, आरोग्य आणि सर्व संपत्तीचा लाभ होवो. 
त्याचप्रमाणे निर्वाण संपत्ती प्राप्त होवो. ।। ४ ।।  
सर्वच संस्कार अनित्य आहेत, उत्पन्न होऊन विनाश पावणे हा त्यांचा स्वभावधर्म आहे. 
या परिवर्तनशील संस्कारातून मुक्त होणे हेच परम सुख ( निर्वाण ) आहे. ।। ५ ।। 
हे भन्ते ! मृत पावलेल्या आमच्या जाती बांधवांच्या स्मृतीकरीता श्रध्दा पूर्ण हे दान 
आम्ही भिक्खू - संघास देत आहोत, त्याचा आपण कृपया स्विकार करावा. ।। ६ ।।

Post a Comment

0 Comments