नरसिंह गाथा

नरसिंह गाथा


पाली:

चक्कवरङिकत रत्तसुपादो, लक्खण मण्डित आयतपण्ही ।  
चामर छत्त विभूसित पादो, एस हि तुय्ह पिता नरसीहो ।। १ ।।  
साक्यकुमार वरो सुकुमालो, लक्खणचित्तित पुण्यसरीरो ।  
लोकहिताय गतो नरवीरो, एस हि तुय्ह पिता नरसीहो ।। २ ।।  
पुण्णससङग निभुमुखवण्णो, देवनरोना पियो नरनागो ।  
मत्तगजिन्द विलासितगामि, एस हि तुय्ह पिता नरसीहो ।। ३ ।।  
खंत्तियसम्भव अग्गकुलीनो, देवमनुस्स नमस्मित पादो ।  
सीलसमाधि पतिठ्ठितचित्तो, एस हि तुय्ह पिता नरसीहो ।। ४ ।।  
आयतयुत्तङग सुसंठीतनासो, गोपमुखो अभिनील सुनेतो ।  
इन्द्रधनु अभिनील भमूको, एस हि तुय्ह पिता नरसीहो ।। ५ ।।  
वठ्ठ सुवठ्ठ सुसंठित गीवो, सींहहनु मिगराज सरीरो ।  
कञ्ञनसुच्छवि उत्कमवण्णो, एस हि तुय्ह पिता नरसीहो ।। ६ ।।  
सिनिध्द सुगम्भीर मञ्ञुसुधोसो हिङगलबध्द सुरतसुजिव्हो ।  
वीसती वीसती सेतसुदन्तो, एस हि तुय्ह पिता नरसीहो ।। ७ ।।  
अञ्ञनवण्ण सुनील सुकेसो, कञ्चनपट्ट विसुध्द ललाटो ।  
ओसधिपण्डर सुध्दसुवण्णो, एस हि तुय्ह पिता नरसीहो ।। ८ ।।  
गच्छति नील पथे विय चन्दो, तारांगण परिवेठ्ठित रुपो ।  
सावकमज्झ गतो समणिन्दो, एस हि तुय्ह पिता नरसीहो ।। ९ ।।

मराठी:

ज्यांचे चरण रक्त वर्ण चक्राने अलंकृत आहेत, ज्यांच्या पावलांच्या टाचा सुंदर आहेत. 
ज्यांचे पावलं चामर - छत्राने सुशोभित आहेत. 
ते जे नरात सिंह आहेत, तेच तुझे पिता आहेत. ।। १ ।।  
ते जे सुकोमल शाक्य कुमार आहेत, जे सुंदर चिन्हांनी परिपूर्ण संपूर्ण शरीर संपन्न आहेत, 
ज्याने लोकांच्या हितासाठी गृगत्याग केला, जे नरात सिंह आहेत, तेच तुझे पिता आहेत. ।। २।।  
ज्यांचे मुखमंडल पूर्ण चंद्राप्रमाणे प्रकाशमान आहे. देव मनुष्य व नाग गणांना प्रिय आहे, 
ते जे मस्त गजेंद्राप्रमाणे जात आहेत, जे नरात सिंह आहेत, तेच तुझे पिता आहेत. ।। ३ ।।  
ते जे सर्वश्रेष्ठ क्षत्रिय कुळात जन्म पावले असून ज्यांच्या चरणांची देव व मनुष्य वंदना करतात, 
ज्यांचे चित्त शील समाधीने परिशुध्द झाले आहे, ते जे नरात सिंह आहेत, तेच तुझे पिता आहेत. ।। ४ ।।  
ज्यांची नासिका विस्तीर्ण आणि सरळ आहे, ज्यांचे नेत्र नील वर्णाचे आहेत, 
ज्यांच्या भुवया इंद्रधनुष्याच्या कमानीप्रमाणे आहेत,  ते जे नरात सिंह आहेत, 
तेच तुझे पिता आहेत. ।। ५ ।।  
ज्यांचा चेहरा गोलाकार आहे, ज्यांची हनुवटी सिंहासारखी व शरीर हरिणाप्रमाणे आहे, 
ज्यांचा रंग सुवर्णाप्रमाणे तेजदार आहे,  ते जे नरात सिंह आहेत, तेच तुझे पिता आहेत. ।। ६ ।। 
ज्यांची वाणी कोमल आहे, गंभीर आहे, मधुर आहे, ज्यांची जिव्हा शेंदुराप्रमाणे रक्तवर्णाची आहे, 
ज्यांच्या मुखात पांढरे शुभ्र सोळा - सोळा असे बत्तीस दात आहेत,  ते जे नरात सिंह आहेत, 
तेच तुझे पिता आहेत. ।। ७ ।।  
ज्यांचे केस काळेभोर, डोळे निळे, ज्यांचे कपाळ सोन्यासारखे तेजोमय आहे, 
ज्यांची काया औषधी ताऱ्याप्रमाणे शुभ्र सुशोभित आहे,  
ते जे नरात सिंह आहेत, तेच तुझे पिता आहेत. ।। ८ ।।  
निळ्या आकाशातील तारांगणात, जे चंद्रासमान व भिक्षुगणात शोभून दिसणारे, 
आपल्या श्रावकां समवेत जात आहेत, ते जे नरात सिंह आहेत, तेच तुझे पिता आहेत. ।। ९ ।।

Post a Comment

0 Comments