पुण्यानुमोदन
पाली:
दुक्खपत्ताच निदुक्खा भयपत्ताच निब्भया ।
सोकपत्ताच निसोक्का होन्तु सब्बेपि पाणि नो ।। १ ।।
एतावताच अम्हे हि सम्भतं पुञ्ञ सम्पदं ।
सब्बे देवानु मोदन्तुं सब्ब सम्पति सिध्दिया ।। २ ।।
दानं ददन्तु सध्दाय सीलं रक्खन्तु सब्बदा।
भावना भिरता होन्तु गच्छन्तु देवतांगता ।। ३ ।।
सब्बे बुध्दा बल पत्ता पच्चे कानञ्च यं बलं ।
अरहन्तानञ्च ते जेन रक्खं बन्धामि सब्बेसो ।। ४ ।।
आकासठ्ठाच भुम्मठ्ठा देवा नागा महिंध्दिका ।
पुञ्ञ तं अनुमोदित्वा चिरं रक्खन्तु सासनं ।। ५ ।।
आकासठ्ठाच भुम्मठ्ठा देवा नागा महिंध्दिका ।
पुञ्ञं तं अनुमोदित्वा चिरं रक्खन्तु देसनं ।। ६ ।।
आकासठ्ठाच भुम्मठ्ठा देवा नागा महिंध्दिका ।
पुञ्ञं तं अनुमोदित्वा चिरं रक्खन्तु त्वं परन्ति ।। ७ ।।
मराठी:
समस्त दुःखी प्राणी दुःखरहित, भयग्रस्त प्राणी भयरहित आणि शोकग्रस्त प्राणी शोकरहित होवोत. ।। १ ।।
हे जे आम्ही कुशल कर्म केलेले आहेत, सर्व सज्जन त्याला अनुमोदन देवोत.
त्यामुळे सर्व संपत्तीची वृध्दी होवो. ।। २ ।।
श्रध्देने दान देण्यात येवो, शीलांचे पालन केले जावो,
सद्भावना संपादन करण्यात येवो आणि निर्वाण प्राप्त होवो. ।। ३ ।।
सर्व बल प्राप्त बुध्दांच्या प्रतापाने, सर्वांना बल प्राप्त होवो आणि अर्हंतांच्या
प्रतापाने आपले सर्व प्रकारे रक्षण होवो. ।। ४ ।।
आकाशात आणि भूमीवर राहणाऱ्या महाप्रतापी देवलोक आणि नागलोक या कुशल
कर्माचे अनुमोदन करोत, म्हणजे चिरकाल पर्यंत बुद्ध शासन आपले रक्षण करो. ।। ५ ।।
आकाशात आणि भूमीवर राहणाऱ्या महाप्रतापी देवलोक आणि नागलोक
या कुशल कर्माचे अनुमोदन करोत, म्हणजे चिरकाल पर्यंत धम्मोपदेश आपले रक्षण करोत ।। ६ ।।
आकाशात आणि भूमीवर राहणाऱ्या महाप्रतापी देवलोक आणि नागलोक या कुशल कर्माचे
अनुमोदन करोत, म्हणजे चिरकाल पर्यंत तुमचे रक्षण करोत. ।। ७ ।।
0 Comments