अष्टशील

अष्टशील


पाली:

पाणातिपाता वेरमणी, सिक्खापदं समादियामि ।। १ ।।  
अदिन्नादाना वेरमणी, सिक्खापदं समादियामि ।। २ ।। 
अब्रम्हचर्या वेरमणी, सिक्खापदं समादियामि ।। ३ ।। 
मुसावादा वेरमणी, सिक्खापदं समादियामि ।। ४ ।। 
सुरा-मेरय-मज्झ-पमाद्ठ्ठाणा वेरमणी, सिक्खापदं समादियामि ।। ५ ।। 
विकाल भोजना, वेरमणी - सिक्खापदं समादियामि ।। ६ ।। 
नच्च-गीत-वादित विस्सूक - दस्सना, 
माला - गंध - विलेपन धारण मण्डन विभूसन 
ठ्ठाना वेरमणी - सिक्खापदं समादियामि ।। ७ ।। 
उच्चासयना महासयना वेरमणी - सिक्खापदं समादियामि ।। ८ ।। 
भन्ते - तिसरणेन सध्दिं अठ्ठाड्गसमनागतं उपोसथ सीलं 
धम्मं साधुकं सुरक्खितं कत्वा अप्पमादेन सीलं सम्पादेथ । 
उपासक / उपासिका - अहं भन्ते ।  
।।  साधू ।।  साधू  ।।  साधू ।।

मराठी:

मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो / करते. ।। १ ।। 
मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो / करते. ।। २ ।।
मी ब्रम्हचर्याने पालन करण्याची प्रतिज्ञा करतो / करते. ।। ३ ।।  
मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो / करते. ।। ४ ।। 
मी मद्य तसेच मोहात पाडणाऱ्या इतर सर्व मादक वस्तुंच्या सेवनापासून 
अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो / करते. ।। ५ ।। 
मी अवेळी भोजन न करण्याची प्रतिज्ञा करतो / करते. ।। ६ ।।  
मी नाच, गाणे, वाद्य, तमाशा इत्यादी पाहण्यापासून तसेच माळा, 
गन्ध, श्रुंगारिक आभुषणे इत्यादी धारण करण्यापासून अलिप्त 
राहण्याची प्रतिज्ञा करतो / करते. ।। ७ ।।  
मी उंच आणि मौल्यवान आसनावर, शय्येवर झोपण्यापासून अलिप्त 
राहण्याची प्रतिज्ञा करतो / करते. ।। ८ ।। 
भन्ते :- त्रिसरणसह अष्टांग उपोसथ शील संपादन करा.  
शील सुरक्षित ठेवून जीवन जगले पाहिजे.  
उपासक / उपासिका :- ठिक आहे भन्ते !  
साधू !  साधू !!  साधू !!! 

Post a Comment

0 Comments