बुध्द वंदना
पाली:
इतिपी सो भगवा अरहं, सम्मासम्बुध्दो विज्जा-चरण संम्पन्नो ।
सुगतो, लोकविदु, अनुत्तरो, पुरिस-धम्मसारथी,
सत्था देव-मनुस्सानं, बुध्दो भगवा’ ति ।
बुद्धं याव जीवितं परियंतं सरणं गच्छामि ।।
ये च बुध्दा अतीताच, ये च बुध्दा अनागता ।
पच्चुप्पन्ना च ये बुध्दा, अहं वन्दामि सब्बदा ।। १ ।।
नत्थि मे सरणं अञ्ञं, बुध्दो मे सरणं वरं ।
एतेन सच्चवज्जेन, होतु मे जय मंगलं ।। २ ।।
उत्तमंगेन वन्दे’हं, पादपसुं वरुत्तमं ।
बुध्दे यो खलितो दोसो, बुध्दो खमतु तं ममं ।। 3 ।।
यं किञ्चि रतनं लोके, विज्जति, विविधा पुथु ।
रतनं बुध्दसमं नत्थि, तस्मां सोत्थि भवन्तु मे ।। ४ ।।
यो सन्निसिन्नो वरबोधीमुले, मारं ससेनं महति विजेत्वा ।
संबोधिमागच्छी अनंतञाणो, लोकोत्तमो तं पणमामि बुध्दं ।। ५ ।।
मराठी:
अर्हंत् ( जीवन मुक्त ) सम्यक सम्बुध्द ( संपूर्ण जागृृत ) विद्या व आचरणांनी युक्त,
सुगती ज्याने प्राप्त केलेली आहे, सर्वश्रेष्ठ, दमनशील पुरुषांचे सारथी व आधार देणारे,
देव व मनुष्य यांचे गुरु असे भगवान बुध्द आहेत. अशा ह्या बुध्द भगवतांचे जन्मभर
अनुसरण करण्याचा मी निर्धार करीत आहे.
मागे जे बुध्द होऊन गेलेत, पुढे जे बुध्द होतील व हल्ली जे बुध्द आहेत,
त्या सर्वांना मी सदासर्वदा वंदन करतो. ।। १ ।।
माझे अन्य कोणतेही सरणस्थान नाही. फक्त बुध्द हेच माझे सरणस्थान आहे.
ह्या सत्य वचनाने माझे जय मंगल होवो. ।। २ ।।
बुध्दांच्या पवित्र चरणधुळीला नतमस्तक होऊन वंदन करतो.
बुध्दांच्यासंबंधी माझ्या हातून काही दोष घडला असेल, तर त्याबद्दल मला क्षमा असो. ।। ३ ।।
ह्या जगात निरनिराळ्या प्रकारची जी अनेक रत्ने आहेत,
त्यापैकी बुध्दांसमान अन्य कोणतेही रत्न नाही. या सत्य वचनाने माझे कल्याण होवो. ।। ४ ।।
ज्याने बोधीवृक्षाखाली बसुन माराचा, त्याच्या अफाट सेनेसह पराभव केला,
अनंत ज्ञान प्राप्त करुन ज्याने सम्बोधी मिळविली,
अशा सर्व जगात सर्वोत्तम असलेल्या श्रेष्ठ बुध्दाला मी प्रणाम करतो / करते. ।। ५ ।।
0 Comments