धम्म वंदना

धम्म वंदना


पाली:

खाक्खातो भगवता धम्मो सन्दिठ्ठीको, अकालिको  
एहिपस्सिको ओपनायिको पच्चतं वेदितब्बो विञ्ञुहीति  
धम्मं याव जीवितं परियन्तं सरणं गच्छामि ।  
ये च धम्मा अतीता च, ये च धम्मा अनागता ।  
पच्चुप्पन्ना च ये धम्मा, अहं वन्दामि सब्बदा ।। १ ।।  
नत्थि मे सरणं अञ्ञं, धम्मो मे सरणं वरं ।  
एतेन सच्चवज्जेन, होतुमे जयमंगलं ।। २ ।।  
उत्तमंगेन वन्दे’हं, धम्मच दुविधं वरं ।  
धम्मे यो खलितो, दोसो, धम्मो खमतु तं ममं ।। ३ ।।  
यं किंञ्ची रतनं लोके, विज्जति विविधा पुथु ।  
रतनं धम्मसमं नत्थि, तस्मा सोत्थि भवन्तु मे ।। ४ ।।  
अठ्ठांगिको अरीयपथो जनानं, मोक्खप्पवेसा उजुको व मग्गो ।  
धम्मो अयं सन्तिकरो पणितो, निय्यानिको तं पणमामि धम्मं ।। ५ ।।

मराठी:

भगवंताने ज्या धम्माचा सुंदर उपदेश केला, ज्याचे सत्यत्व येथेच डोळ्यासमोर पाहता येते, 
जो धम्म आपले फळ ताबडतोब देतो, कोणीही ज्याचा अनुभव घ्यावा, 
जो निर्वाणाकडे घेऊन जातो, हा सिध्दांत विज्ञानाच्या द्वारे स्वतः अनुभवून पाहता येतो. 
अशा या धम्माचे जन्मभर अनुसरण करण्याचा मी निर्धार करीत आहे. 
मागे झालेल्या बुध्दाने जो धम्म उपदेशिला व पुढे होणारे 
बुध्द जो धम्म सांगतील व हल्लीच्या बुध्दाने जो धम्म सांगितला आहे, 
त्या सर्वांना मी सदासर्वदा वंदन करतो. ।। १ ।।  
मी दुसऱ्या कोणाला सरण जाणार नाही, माझे अन्य कोणतेही सरण स्थान नाही. 
बौध्द धम्मच माझे दुसरे सरणस्थान आहे. या सत्य वचनाने माझे जय मंगल होवो. ।। २ ।।  
सर्व दृष्टीनी श्रेष्ठ असलेल्या धम्माला नतमस्तक होऊन वंदन करतो, 
धम्मासंबंधी माझ्याकडून काही दोष घडला असेल, तर त्याबद्दल मला क्षमा असो. ।। ३ ।।  
ह्या जगात जी निरनिराळी अनेक रत्न आहेत, त्यापैकी एकानेही बौध्द धम्माची बरोबरी होणार नाही. 
या सत्य वचनाने माझे कल्याण होवो. ।। ४ ।।  
हा बौद्ध धम्म एक असा सरळ मार्ग आहे की, जो शांतीकारण, उत्तम मार्गाने घेऊन जाणारा, 
अष्टांगानी युक्त, तसेच लोकांना सुख देणारा आहे. त्या धम्माला मी प्रणाम करतो. ।। ५ ।।

Post a Comment

0 Comments