जयमंगल अष्टगाथा
पाली:
बाहुं सहस्समभिनिम्मित सावुधन्तं,
गिरीमेखलं उदित - घोरं - ससेन - मारं ।
दानादि धम्मविधिना जितवा मुनिन्दो,
तं तेजसा भवतु ते जयमङगलानि ।। १ ।।
मारातिरेक - मभियुज्झित सब्बरति,
घोरम्पनालवक मक्खमथध्द - यक्खं ।
खन्ती सुदन्तविधिता जितवा मुनिन्दो,
तं तेजसा भवतु ते जयमङगलानि ।। २ ।।
नालागिरी गजवरं अतिमत्तभूतं,
दावाग्गि चक्कमसनीव सुदारुणन्तं ।
मेत्तम्बुसेक विधिना जितवा मुनिन्दो,
तं तेजसा भवतु ते जयमङगलानि ।। ३ ।।
उक्खित्त खग्गमतिहत्थ सुदारुणन्तं,
धावन्ति योजनपथङगुलि - मालवन्तं ।
इध्दीभिसङगखत मनो जितवा मुनिन्दो,
तं तेजसा भवतु ते जयमङगलानि ।। ४ ।।
कत्वान कठ्ठमुंदर इव गब्भिनिया,
चिञ्चाय दुठ्ठवचनं जनकाय मज्झे,
सन्तेन सोम विधिना जितवा मुनिन्दो,
तं तेजसा भवतु ते जयमङगलानि ।। ५ ।।
सच्चं विहाय - मतिसच्चक वादकेतुं,
वादाभिरोपितमनं अतिअन्धभूतं ।
पञ्ञापदीपजलितो जितवा मुनिन्दो,
तं तेजसा भवतु ते जयमङगलानि ।। ६ ।।
नन्दोपनन्द - भुजंग विवुधं महिध्दिं,
पुत्तेन थेर भुजगेन दमापयन्तो ।
इध्दुपदेस विधिना जितवा मुनिन्दो,
तं तेजसा भवतु ते जयमङगलानि ।। ७ ।।
दुग्गाहदिठ्ठि भुजगेन सुदठ्ठ हत्थं,
ब्रम्हंविसुध्दि जुतिमिध्दि बकाभिधानं ।
ञाणागदेन विधिना जितवा मुनिन्दो,
तं तेजसा भवतु ते जयमङगलानि ।। ८ ।।
एतापि बुध्द जयमङगल अठ्ठगाथा,
यो वाचको दिनदिने सरते मतन्दि ।
हित्वाननेक विविधांनि चुपद्यवानि,
मोक्खं सुखं अधिगमेय्य नरो सपञ्ञो ।। ९ ।।
मराठी:
ज्या मुनीन्द्राने-बुध्दाने, विविध हत्यार धारण करुन सहस्त्रबाहु गिरीमेखला हत्तीवर आरुढ झालेल्या,
अत्यंत भयानक सेनेसह आलेल्या माराला, आपल्या दान आदि धम्मबलाने जिंकले,
त्या भगवान बुध्दांच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो. ।। १ ।।
ज्या मुनीन्द्राने - बुध्दाने, माराव्यतिरिक्त समस्त रात्र संग्राम करणाऱ्या घोर,
दुर्धर आणि निष्ठूर - ह्रदयी अशा आलवक नामक यक्षाला, शांती आणि संयम बलाने जिंकले,
त्या भगवान बुध्दांच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो. ।। २ ।।
ज्या मुनीन्द्राने-बुध्दाने, अग्नीचक्र आणि विजेप्रमाणे अत्यंत भयानक आणि मदोन्मत्त
होऊन चालून आलेल्या नालागिरी हत्तीला, आपल्या मैत्रीरुपी शीतल जलाने जिंकले,
त्या भगवान बुध्दांच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो. ।। ३ ।।
ज्या मुनीन्द्राने-बुध्दाने, हातात तलवार घेऊन एक योजनेपर्यंत न थांबता धावणाऱ्या
अत्यंत भयानक अशा अंगुलिमालाला, आपल्या रिध्दी बलाने जिंकले,
त्या भगवान बुध्दांच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो. ।। ४ ।।
ज्या मुनीन्द्राने-बुध्दाने, पोटावर काष्ट बांधून गर्भवतीसारखे आपले पोट मोठे
झाल्याचे ढोंग केलेल्या चिंचा नामक स्त्रीला (जी बुध्दांना कलंक लावू पाहत होती),
आपल्या शांत आणि सौम्य बलाने जिंकले,
त्या भगवान बुध्दांच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो. ।। ५ ।।
ज्या मुनीन्द्राने-बुध्दाने, सत्य सोडलेल्या व असत्य वादाचा पोषक, दुराभिमानी,
वादविवाद पारंगत व अहंकाराने अंध झालेल्या सच्चक नामक परिव्राजकाला,
प्रज्ञा - दिपाने जिंकले, त्या भगवान बुध्दांच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो. ।। ६ ।।
ज्या मुनीन्द्राने-बुध्दाने, विविध ऋध्दि सिध्दी संपन्न अशा नंदोपनंद नामक भुजंगाला,
आपल्या महामौद्गल्यायन शिष्याकडून ऋध्दि शक्ति आणि उपदेशाच्या बलाने जिंकले,
त्या भगवान बुध्दांच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो. ।। ७ ।।
ज्या मुनीन्द्राने-बुध्दाने, भयंकर मिथ्यादृष्टीरुपी सापाने डसलेल्या,
विशुध्द ज्योति आणि ऋध्दि शक्ति संपन्न अशा बक नामक ब्रम्हज्ञान्याला औषधरूपी ज्ञान देऊन जिंकले,
त्या भगवान बुध्दांच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो. ।। ८ ।।
जो कोणी वाचक भगवान बुध्दांच्या ह्या आठ जय मंगल गाथा दक्षतापूर्वक दररोज पठन करेल,
तो बुध्दिमान व्यक्ती, नाना प्रकारच्या उपद्रवांपासून मुक्त होऊन, सुख प्राप्त करील. ।। ९ ।।
0 Comments