संघ वंदना

संघ वंदना


पाली:

सुपटिपन्नो, भगवतो सावकसंघो, उजुपटिपन्नो भगवतो सावकसंघो,  
ञायपटिपन्नो भगवतो सावकसंघो, सामीचिपटिपन्नो भगवतो    
सावकसंघो यद्दिं - चतारि पुरिस - युगानि अठ्ठ पुरिस - पुग्गला, एस   
भगवतो सावकसंघो,   
आहुनेय्यो, पाहुनेय्यो दक्खिणेय्यो, अञ्ञलि - करणीय्यो.  
अनुत्तरं पुञ्ञक्खेतं लोकस्सा ति ।  
संघ याव जिवितं परियंतं सरणं गच्छामि ।  
ये च संघा अतीता च ये च संघा अनागता ।  
पच्चुप्पन्ना च ये संघा, अहं वन्दामि सब्बदा ।। १ ।।  
नत्थि मे सरणं अञ्ञं संघो मे सरणं वरं ।  
एतेन सच्चवज्जेन, होतु मे जयमंगलं ।। २ ।।  
उत्तमंगेन वन्दे’हं,  संघं च तिविधोत्तमं ।  
संघे यो खलितो दोसो, संघो खमतु तं ममं ।। ३ ।।  
यं किञ्चि रतनं लोके, विज्जति विविधा पुथू ।  
रतनं संघसमं नत्थि तस्मा सोत्थि भवन्तु मे ।। ४ ।।  
संघो विसुध्दो वर दक्खिणेय्यो, सन्तिन्द्रियो सब्बमलप्पहिनो ।  
गुणेहिनकेही समिध्दिपत्तो, अनासवो तं पणमामि संघं ।। ५ ।।

मराठी:

भगवंताचा शिष्यसंघ सन्मार्गावर आरुढ आहे.  
भगवंताचा शिष्यसंघ सरळ मार्गावर आरुढ आहे.  
भगवंताचा शिष्यसंघ ज्ञानाच्या मार्गावर आरुढ आहे.  
भगवंताचा शिष्यसंघ उत्तम मार्गावर आरुढ आहे.  
भगवंताचा शिष्यसंघ अशा नररत्नांचा आहे की, 
ज्यांनी वरील चारी जोड्या व आठ संतपदांची प्राप्ती करुन घेतली आहे. 
हा संघ म्हणजे निमंत्रण देण्यास योग्य, स्वागत करण्यास योग्य, 
दान देण्यास योग्य आणि जगात सर्वश्रेष्ठ पवित्र क्षेत्रा समान आहे. 
असा हा संघ वंदन  
करण्यास योग्य आहे. अशा या संघाला मी जिवंत असेपर्यंत अनुसरतो.  
जे भिक्खु संघ होऊन गेले ते, जे भिक्खु संघ हल्ली आहेत आणि जे भिक्खु संघ होणार आहेत, 
त्या सर्वांना मी सदासर्वदा वंदन करतो / करते. ।। १ ।।  
मला दुसरे कोणतेही सरणस्थान नाही, बुध्दांचा शिष्यसंघच माझे सर्वश्रेष्ठ सरणस्थान आहे. 
या सत्य वचनाने माझे जयमंगल होवो. ।। २ ।।  
तिन्ही प्रकारांनी श्रेष्ठ असलेल्या या संघाला नतमस्तक होऊन वंदन करतो / करते. 
संघासंबंधी जर माझ्याकडून काही दोष घडला असेल, तर मला त्याबद्दल क्षमा असो. ।। ३ ।।  
या जगात जी निरनिराळी अनेक रत्न आहेत, त्यापैकी एकाच्यानेही  
संघाची बरोबरी होणार नाही.  या सत्य वचनाने माझे कल्याण होवो. ।। ४ ।।  
संघ विशुध्द, श्रेष्ठ, दान देण्यास योग्य, शांत इंद्रियांचा, सर्व प्रकारच्या मलांपासून, 
दोषांपासून अलिप्त, अनेक गुणांनी युक्त, तसाच निष्कलंक आहे. 
अशा या संघाला मी प्रणाम करतो / करते. ।। ५ ।।

Post a Comment

0 Comments