भीम स्तुती
दिव्य प्रभरत्न तूं, साधू वरदान तूं,
आद्य कूल भूषं तू भीमराजा ।। १ ।।
सकल विद्यापति, ज्ञान सत्संगति,
शास्त्र शासनमति, बुध्दि तेजा ।। २ ।।
पंकजा नरवरा, रत्त स्वजन उध्दारा,
भगवंत आमुचा खरा, भक्तकाजा ।। ३ ।।
चवदार संगरी, शस्त्र धरीता करी,
कांपला अरि उरी, रौद्र रुपा ।। ४ ।।
मुक्ती पथ कोणता, जीर्ण स्मृती जाळीता,
उजाळीला अगतिका, मार्ग साजा ।। ५ ।।
राष्ट्र घटना कृति, शोभते भारती,
महामानव बोलती, सार्थ संज्ञा ।। ६ ।।
सरण बुध्दास । सरण धम्मास ।
सरण संघास, मी भीमराजा ।। ७ ।।
0 Comments